• Breaking News

    विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांच्या निवडणूक आयोगाला पत्र






    We News 24 MARATHI »मुंबई


    मुंबई:राज्यातील विधान परिषदेच्या ९ रिक्त जागेसाठी निवडणूक जाहीर करावी, अशी विनंती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भारतीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. २४ एप्रिलला राज्यातील विधान परिषदेच्या ९ जागा रिक्त झाल्या आहेत. कोरोना विषाणूच्या संकटामुळे या जागेसाठी होणाऱ्या निवडणूका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही निवडणूक पुढे ढकलल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोर अडचणी उभ्या राहिल्या आहेत.  

    तसेच वाचा-अब भारत के प्रधानमंत्री,अमेरिकी राष्ट्रपति के विमान एयर फ़ोर्स वन जैसे सुरक्षित विमान में सफर करेंगे


    केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या काळात अनेक बाबींमध्ये शिथिलता दिली आहे. त्यामुळे विषेश मार्गदर्शनाखाली या निवडणूका घेता येतील, असा उल्लेख राज्यपालांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रामध्ये केलाय. तत्पूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेच्या रिक्त जागेवर नियुक्ती करावी, याची शिफारस  महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाच्या प्रतिनिधींनी राज्यपालांकडे केली होती. यासंदर्भात निर्णय घेण्यापेक्षा राज्यपालांनी उद्धव ठाकरेंसमोरील पेच सोडवण्याचा निर्णय हा निवडणूक आयोगाच्या कोर्टात टोलवल्याचे पाहायला मिळते. 



    तसेच वाचा-खुद रहें सुरक्षित और अपने घर-परिवार को रखें सुरक्षित मुखिया गीता गुप्ता


    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतीही निवडणूक न लढवता २८ नोव्हेंबर २०१९ रोजी थेट मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.  त्यांना सहामहिन्यांच्या आत विधानसभा किंवा विधान परिषदेवर निवडून यावे लागणार आहे. राज्यपालांनी शिफारस मंजूर केली असती तर त्यांचा मार्ग सुकर झाला असता पण आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार यावर राज्यातील राजकारणाची पुढील गणिते अवलंबून असतील. मुख्यमंत्रीपदासाठी निर्माण झालेल्या तांत्रिक बाबींना हातळण्याचे अनेक मार्ग आमच्याकडे उपलब्ध आहेत, असा विश्वास राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केलाय.

    Header%2BAid

    व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्यांची अद्यतने मिळवण्यासाठी आमच्या मोबाईलवर  ९५९९३८९९०० नंबर सेव्ह करा आणि या नंबरवर मिस कॉल करा. फेसबुक-ट्विटरवर आमच्यात सामील होण्यासाठी https://www.facebook.com/wenews24hindi आणि https://twitter.com/Waors2 वर क्लिक करा आणि पेज लाईक करा.

    कोई टिप्पणी नहीं

    कोमेंट करनेके लिए धन्यवाद

    Post Top Ad

    Post Bottom Ad